धाराशिव
उद्या सोमवारी लोहारा शहर बंदची हाक

लोहारा : परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृती अवमान प्रकरणाच्या निषेधार्थ सोमवारी (१६) रोजी लोहारा बंदची हाक दिली आहे. संविधानप्रेमी नागरिकांनी लोहारा पोलीस निरीक्षक अजित चिंतले यांना बंद बाबत निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, परभणी येथील संविधानाची प्रतिकृती ची विटंबना प्रकरण व भीम सैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची सीआयडी चौकशी करावी या मागणीसाठी सोमवारी (दि.१६) लोहारा बंद ठेवण्यात येणार आहे. या बंदमध्ये व्यापारी, व्यवसायिक, नागरिकांधी बंदमध्ये सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन संविधान प्रेमी नागरिकांनी केले आहे.




