धाराशिव
संभाजी ब्रिगेडच्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये लोहारा तालुकाध्यक्षांची निवड

लोहारा ( जि.धाराशिव ) : मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे महाराष्ट्र राज्याची राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती विधानसभा निवडणुकीनंतर सिंहावलोकन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, या बैठकीसाठी महाराष्ट्र राज्यातून सर्व जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष व महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.महाराष्ट्र राज्यामध्ये होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नजरेसमोर ठेवून जनतेचे हित आणि कल्याण नजरेसमोर ठेवून काम करणारा
HTML img Tag

संभाजी ब्रिगेडचा आंदोलक शिवश्री धनराज बिराजदार यांची संभाजी ब्रिगेड लोहारा तालुकाध्यक्षपदी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष ॲड मनोज दादा आखरे यांच्या हस्ते निवड करण्यात आली. याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ दादा खेडेकर, प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार संभाजी ब्रिगेड धाराशिव जिल्हाध्यक्ष श्री शरद पवार इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत निवडीचे पत्र देऊन सन्मान केला.



