लोहारा शहरात अखंड शिवनाम सप्ताहची सांगता

उस्मानाबाद : लोहारा शहरातील सदाशिव हिरेमठ संस्थान अखंड शिवनाम सप्ताहची रविवारी सांगता झाली. या सप्ताहमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम तसेच मठात सदाशिव महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
राष्ट्र संत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या आशीर्वादाने सिद्धेश्वर शिवाचार्य महाराज (लोहारा), निरंजन शिवाचार्य महाराज(औसा),डॉ.शांतवीरलिंग शिवाचार्य महाराज, गंगाधर शिवाचार्य महाराज सातलिंग स्वामी यांच्या सानिध्यात हा सप्ताह संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्रातील प्रसिध्द शिव कीर्तनकारानी किर्तन सेवा दिली.

HTML img Tag Simply Easy Learning

सिद्धेश्वर शिवाचार्य महाराज यांनी भक्ताना दीक्षा दिली. या सप्ताहनिमित्त शहरात कलश दिंडी काढण्यात आली. काल्याचे किर्तन शि.भ.प.शि.भ.प.कुमार सागर स्वामी यांचे झाले.या सप्ताह हात शहरासह तालुक्यातील नागरिकांनी कीर्तनाला मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. सप्ताह निमित्त अन्नदाते यांच्याकडून महाप्रसाद व अल्पोपहार देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!