निवासी दिव्यांग शाळेत भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा


लोहारा/ उमरगा : लोहारा तालुक्यातील सास्तूर येथील निवासी दिव्यांग शाळेत भारतीय स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिनाच्या गौरवशाली पर्वानिमित्त प्रशालेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
त्याचबरोबर कै.वत्सलाबाई दिगंबर मरेवाड यांच्या स्मृतिपित्यर्थ डॉ.राजीव दिगंबर मरेवाड यांच्या वतीने स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र व रोख पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते प्रशालेतून प्रथम आलेल्या चौधरी रौफ आल्ताफ तसेच द्वितीय क्रमांक मिळवलेली विद्यार्थिनी कु.राणी मोहन मनाळे तसेच प्रशालेतून तृतीय महेश पवार यांना देवून सत्कार करण्यात आला.यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांकडून ड्रिलमार्च व स्वागत गीताने मानवंदना देण्यात आली. विद्यार्थ्यांनी मोबाईलचे तसेच सोशल मिडीयाच्या अतिवापराचे दुष्परिणाम या विषयावर कु.ममता गोटमुखले,कु.सौंदर्या कुकुर्डे,कु.पूजा कुकुर्डे,ऋतुजा साळूंखे, कु.किरण खराते,कु.अदिती गायकवाड, कु.गिताश्री निळे या प्रशालेतील दिव्यांग विद्यार्थीनींनी पथनाट्य सादरीकरण केले.सदर पथनाट्याचे दिग्दर्शन प्रशालेतील कु.सोनाली बेळे या दिव्यांग विद्यार्थीनीने केले.सदर पथनाट्यास उपस्थितांनी भरभरून दाद दिली.सेवानिवृत्त सहाय्यक तुरूंग अधिकारी अशोकराजे सरवदे यांनी रोख स्वरूपात पारितोषिक देऊन या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले.यावेळी अशोकराजे सरवदे यांनी प्रशालेच्या दिव्यांग पूनर्वसन विषयक कार्याचे कौतुक केले.प्रशालेच्या या मानवतावादी कार्यास शुभेच्छा देवून समाजातील दिव्यांग या वंचित घटकासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे अभिवचन दिले.याप्रसंगी सास्तूरच्या प्रथम नागरिक शितलताई पाटील यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना घडविणे हे अत्यंत कठीण काम असून, निवासी दिव्यांग शाळा समर्पित भावनेतून हे कार्य करते आहे.सास्तूर ग्रामपंचायत नेहमीच दिव्यांग बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीली आहे.भविष्यातही सास्तूर ग्रामपंचायत निवासी दिव्यांग शाळेला आवश्यक ते सर्वसहकार्य करण्यास तत्पर राहील.असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक बी.टी.नादरगे यांनी तर सूत्रसंचलन प्रशालेतील विद्यार्थिनी कु.ममता गोठमुखले व सोनाली बेळे यांनी केले व आभार प्रदर्शन प्रवीण वाघमोडे यांनी मानले.Lorem ipsum dolor sit amet, consectetur.