सत्संग सोहळ्याच्या उद्घाटन निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

किल्लारी (ता.औसा) :- जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज व पिठाचे उत्तराधिकारी पूज्य कानिफनाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने नवीन सत्संग उद्घाटन सोहळा गुरुवार दि 15 ऑगस्ट रोजी मौजे तपसे चिंचोली येथील हनुमान मंदिरात आयोजित करण्यात आला आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

    दि 15 ऑगस्ट रोजी सकाळी ठीक ९ वाजता गुरुमाऊलीची भव्य पालखी मिरवणूक, गुरुपूजन , प्रवचन , आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . यावेळी प्रवचनकार भूषण सौ जयश्री नितीन लोखंडे यांचा प्रवचन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. दरम्यान भाविकांसाठी महाप्रसादचे आयोजन केले आहे. भाविकांनी जगद्गुरु श्रींच्या अमृतवाणीचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन तपसेचिंचोली संप्रदाय भक्तसेवा मंडळ च्या वतीने करण्यात आले आहे. या सत्संग सोहळ्याला तपसे चिंचोली ,सह परिसरातील भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!