लोहारा/उमरगा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा होळी या शाळेस ब्राईट नाईट पिक पॉवर प्रा.लिमिटेड दिल्ली यांच्या वतीने 78 स्वातंत्र्य दिनानिमित्त शालेय साहित्य व क्रीडा साहित्य भेट देण्यात आले.
लोहारा तालुक्यातील होळी येथे ब्राईट नाईट पिक पॉवर प्रा.लिमिटेड याच्या वतीने 75.5 मेगावॉट शक्तीचे सोलर प्रोजेक्ट उभारण्यात येत आहे.कंपनीच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच शाळेस खेळाचे साहित्य यामध्ये व्हॉलीबॉल,फुटबॉल, चेस, कॅरम, बॅडमिंटन,क्रिकेट संच प्रत्येकी दोन संच भेट देण्यात आली.तसेच सर्व मुलांना बुंदीचे लाडू व नाष्टा याचे वाटप केले.यावेळी कंपनीचे लीगल मॅनेजर पंडित किसन लंगर, अभियंता सुदर्शन व निशांत प्रताप सिंग, गावच्या सरपंच सरोजा बिराजदार शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उषा चव्हाण, उपाध्यक्ष विनोद गायकवाड,माजी सरपंच अजित जाधव,संतोष चव्हाण,युवराज कोकाटे, तंटामुक्ती अध्यक्ष राम जाधव, लक्ष्मण राठोड,संजय पाटील, माजी सैनिक दिनकर गायकवाड,संजय मनाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक अशोक रोडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी भाषणे केली.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सतीश माळी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.