क्राईम
“गावठी पिस्तुल व तलवार सह दोन आरोपी स्थानिक गुन्हेशाखेच्या ताब्यात”
धाराशिव : स्थानिक गुन्हे शाखा-मा. पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आगामी विधानसभा निवडणुक अनुषंगाने अवैध्द शस्त्र बाळगणारे इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करणे व मालाविषयक गुन्हे उघडकिस अणणे कामी धाराशिव जिल्ह्यात दिनांक 29.10.2024 रोजी पेट्रोलिंग करत असताना पथकास गुप्तं बातमिदारामार्फत माहिती मिळाली की, मौजे पळसप पारधी पिडी येथे राहणारा आकाश उर्फ तोब्या मधुकर पवार, वय 24 वर्षे, रा. पळसप पारधी पिडी ता. जि. धाराशिव याचेकडे एक गावठी कट्टा विनापास परवाना बेकायदेशीररित्या कब्ज्यात बाळगलेला असुन तो सध्या लातुर कडून कळंब कडे येत आहे. अशी खत्रीशीर माहिती मिळाल्यावरुन पथकाने घारागाव जवळ असलेल्या एस टी पॉईट जवळ सापळा लावून नमुद इसमास ताब्यात घेवून त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, सदरचा गावठी कट्टा हा पळसप येथील पारधी पिढी येथे आहे. त्यावर पथकाने नमुद आरोपीसह 01 गावठी कट्टा किंमत 25,000 रु जप्त करुन पोलीसांनी नमूद व्यक्तीविरुध्द शस्त्र कायदा कलम- 3, 25 सह मपोका 135 अन्वये ढोकी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.तसेच आरोपी नामे-राज पांडुरंग पवार, वय 19 वर्षे, रा.तुळजापूर ता. तुळजापूर जि.धाराशिव, हा बेकायदेशीररीत्या अंदाजे 1,000₹ किंमतीची तलवार जवळ बाळगलेले स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकास आर्या चौक तुळजापूर येथे मिळून आला. यावरुन पथकाने नमुद तलवार जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द शस्त्र कायदा कलम- 4, 25 अन्वये तुळजापूर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन. यांचे मार्गदर्शनाखाली सथानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. वासुदेव मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, सचिन खटके, पोलीस हावलदार- विनोद जानराव, अमोल निंबाळकर, समाधान वाघमारे, महिला पोलीस हावलदार शोभा बांगर, पोलीस नाईक -नितीन जाधवर, बबन जाधवर, चालक पोलीस अंमलदार- प्रकाश बोईनवाड,गुरव, दहिहांडे, यांच्या पथकाने केली आहे.