उमरगा :नारायण गोस्वामी
उमरगा तालुक्यातील तलमोड टोलनाका ते फुलवाडी दरम्यान निकृष्ट हायवे बांधकाम मुळे शेकडो जीव गेले. यामुळे हा हायवे त्वरित दुरुस्ती करावा या करिता उमरगा डिबेट या व्हाट्स अप ग्रुप तर्फे” रोड नाही तर टोल नाही”या बिगर राजकीय आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला.
HTML img Tag
येथील जिजामाता हॉस्पिटल मध्ये ग्रुप च्या सदस्यांनी बैठक घेतली. यावेळी जितेंद्र शिंदे,ग्रुपचे ऍडमिन नारायण गोस्वामी, डॉ उदय मोरे, मेघराज बरबडे, नितीन होळे,सरपंच अमर सूर्यवंशी, प्रा शौकत पटेल,बाबा जाफरी सह अनेक सदस्यांनी आपली भूमिका यावेळी स्पष्ट केली.
2014 पासून या हायवे चे काम सुरु आहे. मात्र गेली दहा वर्षे झाली हायवे पूर्ण होत नाही. अन झालेले काम अर्धवट व निकृष्ट आहे. यामुळे शेकडो नागरिकांचे जीव गेले तर हजारो लोक जखमी झाले.
वेळोवेळी आंदोलन करून काहीच उपयोग झाला नाही. म्हणून शेवटी उमरगा डिबेट या व्हाट्स अप ग्रुप च्या वतीने जन आंदोलन उभा करण्याचे ठरले. या बाबतीत विस्तृत चर्चा करण्यासाठी रविवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सादिक कारचे,शिवकुमार लड्डा, ढोणे सर,प्रा शाहूराज कदेरे,जाहेद मुल्ला,सोहेल इनामदार,मनीष सोनी, धनराज गिरी, विशाल सूर्यवंशी, अशोक बनसोडे,महेश माशालकर,दादा गायकवाड , प्रभाकर माने, अमोल पाटील, नदीम मुजावर, प्रसाद गायकवाड, काका गायकवाड, संदीप चौगुले,प्रवीण साठे, शामशोद्दीन जमादार,शेख खाजा राजेंद्र पटवारी,दिलीप जोशी, सुभाष वैरागकर, विश्वराज बरबडे, सह सदस्य उपस्थित होते.
Back to top button
error: Content is protected !!