राजकीय
उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघासाठी युवा नेते आनंद पाटील यांनी उमेदवारी अर्ज घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या…
धाराशिव : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहत असून एका वेगळ्याच वातावरणामध्ये विधानसभेची निवडणूक यावेळेस पार पडत आहे. अनेक इच्छुक उमेदवारांनी उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज उमेदवारी अर्ज घेतले. उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघासाठी युवा नेते आनंद पाटील यांनी आज मंगळवारी उमेदवारी अर्ज घेतला आहे. आनंद पाटील हे धाराशिव जिल्हा परिषदेचे सदस्य असून कमी कालावधीमध्ये त्यांनी जिल्ह्यात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. मिळालेल्या संधीचा पुरेपूर उपयोग करत जिल्हा परिषदेमध्ये अनेक समाज उपयोगी व पायाभूत कामे केल्यामुळे जनतेमध्ये त्यांच्याबद्दल एक विश्वासाचे वातावरण आहे. विशेषता तरुणांमध्ये त्यांच्याविषयी आकर्षण आहे.
आनंद पाटील हे जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांचे खंदे समर्थक असून तानाजी सावंत यांची त्यांच्यावर खास मर्जी असल्याचे राजकीय वर्तुळामध्ये अनेकदा बोलले जाते. अशा वातावरणात त्यांनी आज उमेदवारी अर्ज घेतल्याने अनेकाच्या भुवया उंचावल्या आहेत आनंद पाटील यांचे राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे व एकनिष्ठतेचे संबंध असल्याने थेट वरूनच आदेश आला की काय अशीही चर्चा मतदारसंघांमध्ये सुरू झालेली आहे.