शहरातील नरेंद्र छाया येथे श्री.संत रोहीदास महाराज यांची जयंतीनिमित्त अभिवादन

लोहारा : लोहारा शहरातील नरेंद्र छाया येथे रविवारी ५ फेब्रुवारी रोजी श्री.संत रोहीदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी श्री.संत रोहीदास महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन पञकार निळकंठ कांबळे व सोमनाथ बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रा.गणेश कांबळे, गणेश खबुले, गणेश राजगुरु, महेश माने, प्रेम कांबळे,विवेक कांबळे, कमलाकर क्षीरसागर,आदीराज माने, प्रतिक शिंदे, सिध्दार्थ माने,संजय भालेराव,संदेश कांबळे आदी उपस्थित होते.