श्री बसवेश्वर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सेवेनंतर निवृत्त झाल्याने सत्कार

जेवळी (ता. लोहारा ) सुधीर कोरे
जेवळी (ता लोहारा) येथील श्री बसवेश्वर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक वाय. एस. कांबळे हे ३८ वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त झाल्याने शनिवारी (ता.३०) त्यांचा शाळा, संस्था, नागरिक व माझी विद्यार्थ्यांच्यावतीने सपत्निक सत्कार करण्यात आला.
येथील श्री बसवेश्वर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक वाय. एस. कांबळे हे ३८ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त होत आहेत. सेवेचे शेवटचे बारा वर्ष त्यांच्याकडे येथील मुख्याध्यापक पदाचा पदभार होता. गणित तज्ञ शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या मार्गदर्शनाने येथील अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. शनिवारी (ता.३०) श्री बसवेश्वर शाळेत त्यांचा शाळा, संस्था, नागरिक व माझी विद्यार्थ्यांच्यावतीने सपत्निक सत्कार करण्यात आला. या सत्काराच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेवळी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक भुसणे हे होते. यावेळी शालेय समितीचे सभापती इराप्पा डिग्गे, संचालक अण्णाराव शिंदे, गौरीशंकर पणुरे, प्राचार्य सुरेख चेंडके, पर्यवेक्षक एम वाय भोसले, माजी प्राचार्य दयानंद कापसे, बी एम येळमेली, डी बी खडके, महादेव चौधरी, माजी मुख्याध्यापक बी एम बिराजदार, माजी उपप्राचार्य ए डी वाघमारे, शिक्षक पंडित कार्ले श्रीशैल कारभारी, एस. जी. ढोबळे, एस. एच. खमितकर, यु. के. नलावडे, एम. सी. चौगुले, एम.आर. वकील, आर. बी. चव्हाण, बसवराज मुरूमकर, हंबीरराव कदम, फुलचंद कारभारी, सुरेश दंडगुले, शिवलिंग कारभारी, आर व्ही पाटील, उज्वल कारभारी आदीची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी. आर. भुजबळ, सूत्रसंचालन पी. सी. बनसोडे तर आभार एस. ए. गुरव यांनी मानले.