जिल्हास्तरीय शिक्षक नवोपक्रम स्पर्धेत यश माळवदकर,शेरकर,खंडागळे यांच्या नवोपक्रमांची निवड

लोहारा ( जि.धाराशिव ) : जिल्हास्तरीय शिक्षक यशोगाथा नवोपक्रम स्पर्धा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, धाराशिव यांच्या मार्फत भाषा व गणित विषयाची स्पर्धा घेण्यात आली.यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाडीवडगाव येथील सहशिक्षीका स्वाती शेरकर यांचा पहिली वर्ग गटात भाषा विषयात प्रथम क्रमांक आला.तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आरणी ता. लोहारा येथील सहशिक्षीका सुप्रिया माळवदकर यांनी गोष्टींचा शनिवार या उपक्रमाचे सादरीकरण केले यामध्ये त्यांचा दुसरी वर्ग गटात तृतीय क्रमांक आला.तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अचलेर येथील सहशिक्षक कृष्णा खंडागळे यांचा गणित दुसरी वर्ग गटात गणित परिपाठ या विषयावर सादरीकरण करून गणितीय परिपाठ कसा घ्यावा. गणिताचा वापर कसा करावा याविषयी सांगितले यामध्ये त्यांचा तृतीय क्रमांक आला.सर्व शिक्षकांचा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, धाराशिव व जिल्हा परिषद धाराशिव तर्फे बक्षीस वितरण करून कौतुकाची थाप देण्यात आली.यावेळी शिक्षणाधिकारी प्राथमिक अशोक पाटील, डायटचे प्राचार्य दयानंद जेटनुरे,माध्यमिक शिक्षणाधिकारी सुधा साळुंके यांच्यासह सर्व तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी,डायट अधिव्याख्याता, विस्तार अधिकारी,केंद्रप्रमुख, विषयतज्ञ,साधनव्यक्ती उपस्थित होते.



