लोहारा : धाराशिवव येथील पत्रकार रविंद्र केसकर यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा लोहारा पत्रकारांनी निषेध केला आहे. समाज हल्लेखोरांचा शोध घेवून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी लोहारा तालुका पत्रकारांनी केली आहे.
लोहारा तालुका पत्रकारांच्या वतीने लोहारा तहसिलदार यांना मंगळवारी (दि.२) निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, धाराशिव येथील पत्रकार रविंद्र केसकर यांच्यावर सोमवारी (दि.१) रात्री अज्ञात पाच हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला आहे. अशाप्रकारचे पत्रकारांवर हल्ले सातत्याने होत आहेत. पत्रकारांवरील हल्ले करून प्रसार माध्यमांची मुस्कटदाबी केली जात आहे. लोहारा तालुका पत्रकारांच्या वतीने आम्ही या घटनेचा निषेध व्यक्त करीत आहोत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची तात्काळ दखल घ्यावी. पत्रकार, साहीत्यिक, कवी रविंद्र केसकर यांच्यावर हल्ला करणाऱ्या समाज कंटक हल्लेखोरांचा तात्काळ शोध घेवून त्यांना अटक करावी व कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
लोहारा तहसिलचे अव्वल कारकून उत्तम मुदीराज यांनी निवेदन स्वीकारले. निवेदनावर निळकंठ कांबळे,बालाजी बिराजदार, इक्बाल मुल्ला, अशोक दुबे, अब्बास शेख, गणेश खबोले, तानाजी माटे,जे.के. बायस, विक्रांत संगशेट्टी यांच्यासह पत्रकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.