हराळी येथे साखळी उपोषणास सुरुवात

लोहारा ( जि.धाराशिव) : मराठा आरक्षणासाठी हरळी गावामध्ये संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सुचनेनुसार आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी साखळी उपोषणास सुरुवात सदर आंदोलनास मराठा तरुणांसह गावातील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग आहे. जो पर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हराळी गावामध्ये मराठा आरक्षनासाठी हा लढा सुरूच राहील.सदर आंदोलनात निर्मलाताई सूर्यवंशी, शालूताई सूर्यवंशी,मंदाकिनीताई सूर्यवंशी, अर्चनाताई धानुरे,छायाताई धानूरे,लक्ष्मीताई धानुरे,शांताबाई सूर्यवंशी,भारतताई सूर्यवंशी, मीनाबाई हासुरे, सुवर्णाताई सूर्यवंशी, रंजनाताई हासुरे, शारदाबाई सूर्यवंशी आदींचा सक्रिय सहभाग होता.