धाराशिव
लोकमंगल ऊस गळीत हंगामासाठी कारखाना सज्ज करण्याचे प्रशांत पाटील यांचे आवाहन

लोहारा – आज दिनांक 08 जुलै 2025 रोजी लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज लिमिटेड, लोहारा (खुर्द) येथील मिल रोलर पूजन ह. भ. प. रामकृष्ण महाराज कानेगावकर यांच्या पवित्र हस्ते संपन्न झाले. यावेळी कारखान्याचे संचालक श्री. प्रशांतजी पाटील साहेब यांच्या उपस्थितीत पूजन विधी पार पडला.
येणाऱ्या ऊस गळीत हंगामात मोठ्या प्रमाणावर ऊसाची उपलब्धता असून, कारखाना वेळेत सुरू करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी एकजुटीने व तत्परतेने तयारी करावी, असे आवाहन प्रशांत पाटील साहेब यांनी केले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास टिकवण्यासाठी वेळेवर गाळप सुरू होणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमास कारखान्याचे वरिष्ठ सरव्यवस्थापक छगनजी भोगाडे साहेब, विविध विभागांचे प्रमुख व मोठ्या संख्येने कर्मचारीवर्ग उपस्थित होता. पूजनानंतर उपस्थित कर्मचाऱ्यांनी नव्या हंगामासाठी नवीन जोमाने काम सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला.



