लोहारा/उमरगा : प्रतिनिधी
जम्मू कश्मीर व हरियाणा या दोन राज्याच्या विधानसभा निवडणुकीत जाहीर झालेल्या निवडणूक निकालामध्ये भारतीय जनता पक्षाने मोठे यश मिळवल्याने व हरियाणामध्ये स्वबळावर बहुमताने तिसऱ्यांदा सरकार पुन्हा स्थापन केल्याने या विजयाचा जल्लोष लोहारा तालुका भाजपाच्या वतीने दि.9 ऑक्टोंबर 2024 रोजी लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सायंकाळी पाच वाजता फटाके फोडून व मिठाई वाटून साजरा करण्यात आला.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष शिवशंकर हत्तरगे, जिल्हा कोषाध्यक्ष नेताजी शिंदे, माजी जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, माजी तालुकाध्यक्ष अनिल ओवांडकर, तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, तालुका सरचिटणीस दगडु तिगाडे, तालुका सरचिटणीस विष्णु लोहार, तालुका उपाध्यक्ष संपत देवकर, तालुका उपाध्यक्ष दिलीप पवार, बुद्धीजीवी जिल्हा संयोजक प्रमोद पोतदार, कल्याण ढगे, अमोल शेट्टी, तालुका चिटणीस युवराज जाधव, दत्ता कडबाने, विजय महानुर, राजकुमार मोरे, राजु कोराळे, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.