लोहारा / उमरगा : शासनाने ठरवून दिलेल्या किमतीनुसार मूग,उडीद, सोयाबीन खरेदी करण्याच्या आदेश निर्गमित झाले असून त्यानुसार लोहारा तालुक्यातील मार्डी येथे हे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे.
यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन दाखल करावेत असे आवाहन संस्थेचे सचिव संस्थेचे अध्यक्ष भगवान पाटील यांनी केले आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने मूग धान्यासाठी आठ हजार 682 उडीद यासाठी 7400 तर सोयाबीन करता 4 हजार 892 रुपये हादर निश्चित करण्यात आला आहे बाजारात सध्या तिन्ही पिके व्यापाऱ्याकडून कवडीमोल भावाने खरेदी केली जात आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे याची दखल शासनाने घेऊन तात्काळ पणन महासंघ व जिल्हा पणन अधिकारी यांच्यावतीने जिल्ह्यामध्ये खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे.
त्यानुसार जगदंबा खरेदी विक्री सहकारी संस्था लोहारा या संस्थेत मान्यता देण्यात आली आहे येथे उडीद मुगाची यादी १० ऑक्टोबर तर सोयाबीनची खरेदी 15 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे यासाठी परिसर परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करावी असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष भगवान पाटील यांनी केले आहे
Back to top button
error: Content is protected !!