लोहारा तालुक्यात होणार मराठा योद्धा मनोज जारांगे पाटील यांची विराट सभा

लोहारा ( जि.धाराशिव ) / प्रतिनिधी
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी लढा देनारे मराठा योद्धा मनोज दादा जरांगे यांची लोहारा तालुक्यातील माकणी गावालगत करजगाव येथे विराट सभा 11 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10:00 वाजता होणार असून यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने सभा स्थळाचे भूमिपूजन सोमवारी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले .
यावेळी वाहनाच्या पार्किंग साठी व्यवस्थाची पाहणी ही करण्यात आली
सभेसाठी अंदाजे 30 एक्टरवर जागा उपलब्ध असून व वाहनांच्या पार्किंगसाठी विविध मार्गावर वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे ,
या सभेच्या तयारीसाठी गुरुवारी (30) सकाळी दहा वाजता पाटील कॉम्प्लेक्स लोहारा या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीसाठी सकल मराठा समाजाने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.