खा. संजय राऊत यांच्या जामिनावर ९ नोव्हेंबरला सुनावणी

मुंबई : खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर सुनावणी न्यायालयाने राखून ठेवली आहे. आता ९ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.
खा.संजय राऊतांच्या जामिनासंदर्भात ईडीने बुधवारी लेखी उत्तर सादर केले. दरम्यान, संजय राऊतांना कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने अटक केली होती. विशेष म्हणजे प्रवीण राऊत आणि संजय राऊत यांच्या जामिनावर एकाच दिवशी ९ नोव्हेंबरला न्यायालय निर्णय देणार आहे.