ज्ञान प्रबोधिनी संस्थेला जिल्हाधिकारी व सीओची भेट

लोहारा (उस्मानाबाद ) : लोहारा तालुक्यातील हराळी येथील ज्ञान प्रबोधिनी संस्थेला जिल्हाधिकारी सचिन ओंबासे, जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकरी डॉ.राहुल गुप्ता यांनी बुधवारी २ नोव्हेंबर रोजी भेट देऊन पहाणी केली.
यावेळी तहसीलदार संतोष रुईकर, लोहारा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शितल खिंडे उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी सचिन ओंबासे व मुख्य कार्यकारी अधिकरी डॉ.राहुल गुप्ता यांनी ज्ञान प्रबोधिनी संस्थेच्या कामाविषयी माहिती घेतली व प्रत्यक्ष संस्थेचा परिसर पाहून उस्मानाबाद जिल्ह्यासाठी प्रशासन व संस्था असे एकत्रित कशा प्रकारे कार्य करता येईल याबाबत ज्ञान प्रबोधिनी संस्थेचे केंद्र प्रमुख अभिजित कापरे यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली.

HTML img Tag Simply Easy Learning

यावेळी संस्थेच्या विश्वस्त लताताई भिशीकर, केंद्र व्यवस्थापक सुहास पाठक, सचिन सुर्यवंशी व महेश राजे उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!