अंधेरी पूर्व विधानसभेसाठी आज मतदान

मुंबई : अंधेरी पूर्वचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज गुरुवारी मतदान होणार आहे.
राज्यातील सत्तांतरानंतरची ही पहिलीच पोटनिवडणूक असून ,पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना प्रथमच ‘ धनुष्यबाण ‘ चिन्हाऐवजी ‘ मशाल ‘ या निवडणूक चिन्हावर लढत आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या नव्या चिन्हाला मतदारांचा कसा कौल मिळतो , याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांच्यासह सात उमेदवार रिंगणात आहेत. भाजपने या पोटनिवडणुकीतून माघार घेतली असली तरी लटके यांच्यासमोर छोटे पक्ष आणि अपक्ष उमेदवारांचे आव्हान आहे. यामुळे या निवडणूकीकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.