न्यायमूर्ती महेश देवकते यांचा सत्कार

लातूर : महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे २००३-२००४ या शैक्षणिक वर्षाचे माजी विद्यार्थी मा.महेश रामचंद्र देवकते यांचा प्राचार्य डॉ.श्रीकांत गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

HTML img Tag Simply Easy Learning

याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.राजकुमार लखादिवे, माजी प्राचार्य उमाकांत बिरादार,डॉ.श्रद्धा मिसर,अँड.महेश शिंदे,श्री नागोराव गोरे,प्रा भरत वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. न्यायमूर्ती देवकते यांची २००९ मध्ये न्यायीक सेवेत निवड झाली असुन सध्या ते मालवण जिल्हा सिंधुदुर्ग येथे न्यायाधीश पदावर कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी न्यायाधीश म्हणून बीड, यवतमाळ, सोलापुर येथे सेवा केली आहे. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की,महात्मा बसवेश्वर महाविद्यालय हे विद्यार्थ्यांची माणुसकीच्या जाणिवेतून जडणघडण करणारे आहे. या महाविद्यालयात माझ्यावर जे संस्कार झाले आहेत,जी प्रेरणा मिळाली आहे त्यामधूनच मी न्यायाधीश पदापर्यंत पोहोचू शकलो आहे. महाविद्यालयाने संस्काराची आणि शैक्षणिक परंपरेची उज्वल परंपरा जोपासावी आणि उत्तरोत्तर या महाविद्यालयाची प्रगती घडून यावी अशी त्यांनी आशा व्यक्त केली. यावेळी प्रा. रवींद्र सोनोने, डॉ.कैलास पाळणे, बादल बनसोडे आदीची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!