वाढदिवसाचा खर्च न करता विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप

लोहारा / उमरगा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलवाडी येथील आदिती ज्ञानेश्वर शिंदे या मुलीचा वाढदिवस त्यांच्या पालकांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना रजिस्टर पेन व खाऊ वाटप करून साजरा केला.
वाढदिवसावर होणारा खर्च कमी करून सामाजिक भावना जोपासून विजय शिंदे यांनी हा उपक्रम बेलवाडी गावामध्ये राबवला. याप्रसंगी उपस्थित आई स्वप्नाली शिंदे वडील ज्ञानेश्वर शिंदे आजोबा विजय शिंदे ग्रामस्थ शरद भगत लहू जाधव लक्ष्मण जाधव सर्जेराव बनसोडे सागर कदम उपसरपंच बालाजी शिंदे शाळेचे मुख्याध्यापक परमेश्वर सूर्यवंशी अनंत कानेगावकर खिजर मोरवे निर्मले सुनंदा कलशेट्टी मल्लिकार्जुन छाया जाधव बबीता शिंदे याप्रसंगी गावातील सर्व नागरिक उपस्थित होते.