बेलवाडी जिल्हा परीषद शाळेतील शिक्षकांचा सन्मान

लोहारा / उमरगा : लोहारा तालुक्यातील बेलवाडी गाव म्हणजे अंदमान निकोबार बेट त्या बेटावर गावातील सर्व ग्रामस्थांच्या मदतीने एक आदर्श शाळा निर्माण करण्याचा प्रयत्न सर्व शिक्षकांनी केला म्हणून शाळेतील सर्व शिक्षकांचा सन्मान गावातील ग्रामस्थांनी केला .महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार मिळाल्यामुळे सुनंदा मधुकर निर्मले यांचा सत्कार करण्यात आला. खरं म्हणतात ना गावाला शाळेचा व शाळेला गावाचा आधार असला पाहिजे खरच बेलवाडी मधील ग्रामस्थांच्या मदतीमुळे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या शाळेचा तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक आला व अनेक विद्यार्थी राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले स्कॉलरशिप व नवोदय मध्ये पण विद्यार्थ्यांनी बाजी मारली. हे सर्व जे झाले ते बेलवाडी गावातील सर्व ग्रामस्थामुळे सर्वांच्या सहकार्याने आज बेलवाडी शाळा तालुक्यातील आदर्श शाळा म्हणून ओळखली जाते.