निळकंठेश्वर जनक धोत्रेकर यांची सहाय्यक अभियंता श्रेणी -१ या पदावर निवड

उमरगा : नारायण गोस्वामी

शहरातील निळकंठेश्वर जनक धोत्रेकर या युवकाने MPSC मार्फत स्पर्धा परीक्षेत उत्तम यश संपादन केले असून त्याची सार्वजनिक बांधकाम विभागात सहाय्यक अभियंता श्रेणी -1 या पदावर निवड झाली आहे.

त्याच्या निवडीबद्दल विजय धोत्रेकर ,अजय देशमुख ,उत्कर्ष देवणीकर ,नारायण गोस्वामी यांनी अभिनंदन केले आहे . याबद्दल येथील आमदार ज्ञानराज चौगुले यांनी निळकंठेश्वर याचा यथोचित सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विद्या धोत्रेकर,स्वाती धोत्रेकर,विकास कांबळे सह कुटुंबीय उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!