स्वराज्य ग्रुप गणेशोत्सवाच्या अध्यक्षपदी श्री महादेव आनंदगावकर

HTML img Tag Simply Easy Learning
लोहारा/ उमरगा :
लोहारा तालुक्यातील भातागळी येथील स्वराज्य ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवासाठी शनिवारी (दि.१७) बैठक पार पडली या बैठकीत सोहळा समितीची कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.

यामध्ये समितीच्या अध्यक्षपदी श्री महादेव आनंदगावकर उपाध्यक्ष पदी श्री महादेव जगताप सचिव पदी अजित यादव व धनंजय शिंदे सहसचिव पदी प्रविण जगताप मिरवणूक प्रमुख पदी महेश जगताप व खंडू फत्तेपुरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

स्वराज ग्रुप चे मार्गदर्शक उपसरपंच हनुमंत कारभारी, तानाजी आनंदगावकर, प्रविण पाटील अन्नदाते उत्तम सुरवसे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सदरील बैठक पार पडली.

यावेळी गणेशमूर्ती ही युवा उद्योजक प्रज्योत जगताप व बळवंत आनंदगावकर यांच्या वतीने देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

प्रत्येक वर्षी समितीच्या वतीने वेगवेगळे सामाजिक कार्य करीत मोठ्या उत्साहात गणेशोत्सव सोहळा साजरा करण्यात येतो, यावर्षी समितीच्या वतीने 500 पेक्षा जास्त वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

या बैठकीसाठी स्वराज्य ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज जगताप कैलास इंगळे श्रीकांत गिरी अनंत पोतदार प्रशांत अभंगराव माऊली आनंदगावकर प्रभू खोत प्रवीण जगताप समदळे नाना, पवन जगताप सुधाकर साठे बाळासाहेब आनंदगावकर राहुल सुरवसे प्रतिक आनंदगावकर यांच्यासह आदी स्वराज्य ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!