लोहारा/उमरगा : शिवसेनेच्या वतीने लोहारा तालुक्यासाठी रुग्णवाहिका देण्यात आली होती. हि रुग्णवाहिका नादुरुस्त झाली होती. त्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत होती. याची दखल घेऊन आ.ज्ञानराज चौगुले यांनी रुग्णांची सोय व्हावी म्हणुन तात्काळ रुग्णवाहिका दुरुस्त करुन रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध करुन दिली आहे. या रुग्णवाहिकेचे दि.17 ऑगस्ट 2024 रोजी नगराध्यक्ष वैशाली खराडे यांच्या हस्ते पुजन करुन जनसेवेत पुन:च्छ समर्पित करण्यात आली.
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख मोहन पणुरे, लोहारा तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील, प्रताप लोभे, उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, गटनेत्या सारिका बंगले, माजी गटनेते अभिमान खराडे, राजेंद्र माळी, नगरसेविका श्रीमती शामल माळी, नगरसेवक अमिन सुंबेकर,विजयकुमार ढगे, गौस मोमिन, आरिफ खाणापुरे, अविनाश माळी, शिवसेना तालुका उपप्रमुख परमेश्वर साळुंके, पं.स.माजी सदस्य इंद्रजित लोमटे, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, शहर प्रमुख श्रीकांत भरारे, के.डी. पाटील, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, ओम कोरे, मल्लीनाथ घोंगडे, माजी नगरसेविक श्रीनिवास माळी, प्रशांत थोरात, कुंडलीक सुर्यवंशी, सुरेश दंडगुले, नयुम सवार, महेबुब शेख, सचिन करे, मुसा शेख, संदिपान बनकर, श्रीकांत बिराजदार, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हि नादुरुस्त असलेली रुग्णवाहिका दुरुस्त करुन रुग्णाची सोय केल्याबध्दल आ.ज्ञानराज चौगुले यांचे तालुक्यातुन आभार मानण्यात आले.
Back to top button
error: Content is protected !!