शेतकऱ्यावर अन्याय काढणारे जुलमी परिपत्रक रद्द करावे यासाठी शुक्रवारी धरणे आंदोलन

धाराशिव : केंद्र शासनाचे 30 एप्रिल 2024 चे खरीप 2023 संदर्भात शेतकऱ्यावर अन्याय काढणारे जुलमी परिपत्रक रद्द करावे या प्रमुख मागणीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी तुळजापूर तहसील कार्यालयासमोर 9 ऑगस्ट वार शुक्रवार रोजी अकरा ते एक यावेळेस धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आंदोलनाचे प्रमुख पिक विमा याचिकातर्फे अनिल जगताप व राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष सक्षणाताई सलगर यांनी प्रसिद्धी पत्रिका द्वारे दिली आहे.
केंद्र शासनाने काढलेल्या लोकसभेच्या अधिकार समितीच्या काळातील परिपत्रकामुळे धाराशिव जिल्ह्यातील पाच लाख 19 हजार शेतकरी हक्काच्या पिक विमा पासून वंचित राहत असून त्यांना प्रत्युत्तर वीस हजार रुपयांचा फटका बसत आहे तसेच धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे थकलेले कांदा अनुदान प्रोत्साहन अनुदान सततच्या पावसाचे अनुदान दुष्काळाचे अनुदान दुधाचे अनुदान तातडीने मिळावी सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देताना ही पीक पाहणी अट रद्द करावी खरीप 2020 मधील विलंब रकमेसाठी ही मंजूर व्याज मागणी याचिकेतील रक्कम ठरूच मिळावी ही वर्षी प्रक्रिया सुलभ करावी इत्यादी मागण्यासाठी सदरील धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
प्रमुख मागण्या.
1️⃣ केंद्र शासनाचे 30 एप्रिल 2024 चे शेतकऱ्यावर अन्याय करणारी जमीन परिपत्रक रद्द करून जुन्या परिपत्रकाप्रमाणे पीक विमा नुकसान भरपाई द्यावी. (खरीप 2023)
2️⃣ खरीप 2020 मधील विलंब रकमेसाठी मंजूर व्याज मागणी याचिकेतील रक्कम त्वरित शेतकऱ्यांना मिळाली विलंबस जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यावर नागरिकांच्या सेवा कायदा 2015 नुसार योग्य ती कार्यवाही करावी.
3️⃣ धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्याचे शासनाकडे सक्रित असलेले कांदा अनुदान बीड अनुदान प्रोत्साहन अनुदान सततच्या पावसाच्या अनुदान दुष्काळाचे अनुदान तुषार संच अनुदान तातडीने शेतकऱ्यांना वितरित करण्यात यावे.
4️⃣ रब्बी हंगाम 2023 मधील पीक नुकसान भरपाई तातडीने देण्यात यावी.
5️⃣ सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देताना इ पीक पाहणी अट रद्द करावी.
6️⃣ केवायसी प्रक्रिया सुलभ करावी आधार लिंक खात्यावरती शासकीय मदत देण्यात यावी.
मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी या अगोदर 26 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात आले होते मात्र अद्यापही मागण्या मान्य झाल्या नाहीत म्हणून आता प्रत्येक तालुका स्तरावर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून 9 ऑगस्ट रोजी अर्थात क्रांती दिनी तुळजापूर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन होत आहे.
आंदोलनाला यापूर्वीच खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास दादा पाटील, एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युती प्रदेश अध्यक्ष शिक्षणासाठी सलगर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर प्रतापसिंह पाटील,l काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील ,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शरद पवार ,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आदित्य गोरे व विविध 69 ग्रामपंचायतीने पाठिंबा दिलेला आहे.