लोहारा /उमरगा (जि. धाराशिव) : शहरातील लोकप्रिय आणि कृतीशील नगरसेवक अमीन सुंबेकर यांचा वाढदिवस बुधवारी विविध संघटनांकडून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महिलांना साडी वाटप तर ग्रामीण रूग्णालयातील रूग्णांना फळे वाटप करण्यात आली.

नगरसेवक सुंबेकर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील ठिकठिकाणच्या मुख्य चौकात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. वाढदिवसाचा मुख्य सोहळा छत्रपती शिवाजी महाराज चौकात पार पडला. यावेळी केक कापून उपस्थित मान्यवरांनी नगरसेवक सुंबेकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी नागरीक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
Back to top button
error: Content is protected !!