शिवसैनिकांनी एकजुटीने उमरगा लोहारा तालुका विधानसभेवर भगवा फडकवा- संपर्क प्रमुख सुनील काटमोरे

लोहारा/उमरगा : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी दिलेले आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रभर भगवा सप्ताहाच्या माध्यमातून मतदान नोंदणी शिवसेना सदस्य नोंदणी करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून लोहारा तालुक्यातील सर्व शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांचा बैठक लोहारा येथे घेण्यात आली.

  धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुका हा सदैव शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे यावेळी उमरगा लोहारा विधानसभेतून 44,000 मतांच्या लीडने खासदार ओमराजे निंबाळकर हे आघाडीवर राहिले. महाविकासकातील पदाधिकाऱ्यांच्या एकजुटीचा हा विजय असून यापुढील काळातही उमरगा व लोहारा तालुका हा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा बालेकिल्ला आहे हे दाखवून देण्याची विधानसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये जे आपल्यातून निघून गेले आहेत त्यांना त्यांची जागा दाखवण्याचा व उद्धव साहेब ठाकरे यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याचा हीच वेळ आहे. महाराष्ट्राबरोबर गद्दारी करून अनेक उद्योगधंदे महाराष्ट्राच्या बाहेर घेऊन जाऊन तरुणांच्या हातांचे काम काढून घेऊन आपल्या महाराष्ट्राला कमकुवत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महायुतीला धडा शिकवण्याची हीच वेळ आहे यामुळे येणाऱ्या येणाऱ्या विधानसभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून देऊन हा सदैव ठाकरेंचाच बालेकिल्ला आहे हे आपण सर्वांनी मिळून दाखवून देऊ असे याप्रसंगी शिवसेना संपर्कप्रमुख सुनीलजी काटमोरे यांनी मार्गदर्शन केले. यासह शिवसेना उबाठा तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांनीही मार्गदर्शन केले.

महाविकास आघाडी समवेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा सर्व शिवसैनिकांनी गाफील न राहता जोमाने कामाला लागून आपल्या विधानसभेवर भगवा फडकविण्याचा निर्धार या निमित्ताने केला.

तसेच याप्रसंगी लोहारा शहरातील महेश यशवंत पाटील व अरबाज चाऊस यांची महाराष्ट्र पोलीस मध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार ही करण्यात आला.

या बैठकीचा प्रसंगी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बाबा पाटील, उपजिल्हाप्रमुख बसवराज वरनाळे, शेतकरी सेना जिल्हाप्रमुख विजयकुमार नागणे,लोहारा तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, शेतकरी सेना तालुकाप्रमुख शेखर पाटील, माजी नगराध्यक्ष रजाक अत्तार, माजी उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, शिवसेना शहर प्रमुख सलीम माजी सभापती विलास भंडारे ,शिवदूत पंडित बारगळ, महबूब गवंडी,प्रा.पाडूरंग पौळे, श्याम नारायणकर, अशोक राजे सरवदे, विरपक्ष स्वामी, संजय कांबळे,सातलिंग स्वामी,सदाशिव भातागळीकर,विलास होटकर,गुरुनाथ यादव, शहाजी आळंगे, गोपाळ गोरे,पिंटू गोरे,प्रेम लांडगे, बालाजी जाधव,कुंडलिक सूर्यवंशी, ज्ञानेश्वर लोभे,दत्ता पाटील,ज्ञानेश्वर भुजबळ,अहमद पटेल,सुभाष बिराजदार, नितीन सूर्यवंशी,बंकट माळी,राहुल गरजे, तुळशीदास शिंदे महादेव आनंदगावकर गणेश फत्तेपुरे,आप्पासाहेब पवार,रघुवीर घोडके,महेश चपळे,पप्पू जाधव तालुक्यातील उपतालुकाप्रमुख,विभाग प्रमुख यांच्यासह युवा सेनेचे पदाधिकारी,युवासैनिक महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!