लोहारा/उमरगा (जि.धाराशिव ) : सोलापुर येथील शेळगी मित्र नगर येथे साईप्रसाद संग्राम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गेले सहा वर्षे झाले रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते.
यावर्षी रविवारी ४ ऑगस्ट २०२४ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी युवा नेते किरण (मालक) देशमुख, नगरसेवक भोसले, नगरसेवक बनसोडे ,नगरसेवक कारभारी, मार्केट यार्ड व्यापारी असो. अध्यक्ष महालिंग परमशेट्टी, श्री. संग्राम पाटीस, श्री सोमनाथ रागबले, विरेश उंबरजे, नागेश उंबरजे, नागेश कोप्पा, चापले बंधू, श्री सल्लाक्की मालक, प्रेमा चाकई, प्रो. शेखर जगदे, संतोष बंडगर, अजय कुंभार, शिव पाटील यांच्यासह आदी उपस्थित होते. याप्रसंगी १०४ रक्तदात्यानी केले.
चि. साईप्रसादचा वाढदिवसाच्या निमित्ताने आज रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या कॅम्प मध्ये सर्व स्तरातील आदरणीय रक्त दात्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाल्याने एकूण 104 रक्त दात्यानी रक्तदान करून चि. साईप्रसाद प्रति प्रेम व्यक्त केले व जणू कांही आमचे सोबत रक्तसंबंध निर्माण केले या सर्वांचे आम्ही पाटील परिवार मनापासून आभारी आहोत. या पुढील काळात आपली सेवा करण्याची संधी द्यावी नम्र विनंती आपला संग्राम पाटील