250 रेशन कार्ड धारकांच्या समस्यांचे निराकरण
लोहारा / उमरगा : मौजे.नाईचाकुर ता. उमरगा येथील ग्रामपंचायत मार्फत आमदार ज्ञानराज चौगुले यांना रेशन कार्ड धारक यांच्या समस्येबाबत कॅम्प आयोजीत करणे बाबत विनंती करण्यात आली होती. त्यानुसार आमदार ज्ञानराज चौगुले यांनी लागलीच तहसील प्रशासनास कॅम्प घेणेबाबत सुचना केल्या होत्या. त्याअनुषंगाने आज दि.05/08/2024 रोजी नाईचाकुर येथे कॅम्प घेत 250 कार्ड धारकांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले. कॅम्प आयोजीत केल्याबद्दल ग्रामपंचायत नाईचाकुर च्या वतीने आमदार ज्ञानराज चौगुले यांचे आभार मानण्यात आले.
यासाठी पुरवठा नायब तहसीलदार अमित भारती, सरपंच चंद्रकांत स्वामी, उपसरपंच भिमाशंकर पवार, तलाठी कांबळे, ग्रामसेवक नलावडे, बी.के. पवार, प्रदीप(बप्पा) पवार, पोलीस पाटील बाळु स्वामी, सिद्धेश्वर माने, सतीश केशवराव पवार, शरद सावकार, यशपाल कांबळे, महिंद्र कांबळे, व्यंकटदास पवार, विकास पवार व तहसील पुरवठा विभागाचे कर्मचारी यांनी परिश्रम घेत कॅम्प यशस्वी केला.