हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात सेंद्रिय शेतीचे महत्व

सुधीर कोरे
जेवळी, ता.लोहारा
जेवळी (ता. लोहारा) येथे नवप्रभा महिला प्रभाग संघ अंतर्गत क्रांती महिला ग्राम संघामार्फत पार पडलेल्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात सेंद्रिय शेतीचे महत्व पटवत उपस्थित महिलांना भाजीपाल्याचे बियाण्यांचे किट वाटप करण्यात आले.
येथील महिला मंडळ बहुउद्देशीय सभागृहात शुक्रवारी (ता.२७) नवप्रभा महिला प्रभाग संघ अंतर्गत क्रांती महिला ग्राम संघामार्फत हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच महानंदा पणुरे या होत्या यावेळी रूढी परंपरेला फाटा देत या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात विधवा व परित्यक्ता महिलांना प्राधान्य देण्यात आले होते. याप्रसंगी दररोजच्या आहारात सेंद्रिय अन्नाचे महत्त्व पटवून देत विविध भाजीपाल्याच्या बियाणांचे किट वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच महानंदा पणुरे, ग्रामपंचायत सदस्य विजया गाडेकर, गंगुबाई हावळे, कविता पवार, उमादेवी चवले, लैला शिंदे, जयश्री म्हेत्रे, शामल गुंजोटे आदींची उपस्थिती होती.