काक्रंबा येथे फ्रेंड्स टीमतर्फे एकदिवसीय क्रिकेट लीगचे आयोजन

तुळजापुर : तुळजापुर तालुक्यातील काक्रंबा गावामध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त फ्रेंड्स टीम तर्फे एकदिवसीय क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात आले होते.
या क्रिकेट लीगचे उद्घाटन गणपत पाटील, अमित बंडगर,सचिन खताळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पप्पू पाटील,पवन वाघमारे,निखिल कापसे, स्वप्निल ढेरे, किसन बेडगे आदी उपस्थित होते. या एकदिवसीय लीगसाठी प्रसाद मोरे, बबन घोगरे,अमर कानडे,सौरभ भिसे,रामेश्वर क्षीरसागर, महेश बेडगे, प्रविण वाघमारे,शिवरत्न साठे आदीनी परिश्रम घेतले.



