सेवानिवृत्तीनंतर सेवाकार्य करणाऱ्या कदम ब्रिजलाल यांचा औसा शिक्षक पतसंस्थेतर्फे सत्कार

औसा : औसा तालुका शिक्षक सहकारी पतसंस्था सेवानिवृत्तीनंतर सेवाकार्य करणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षण विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुख, प्राथमिक पदवीधर, शिक्षक, शिक्षिकांच्या हस्ते पतसंस्थेचे ध्वजारोहण करून त्यांचा पतसंस्थेच्या वतीने सत्कार करण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम गेल्या ९ वर्षापासून राबवीत असून या उपक्रमात सेवानिवृत्तीनंतर शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याचे कार्य करणारे सेवानिवृत्त प्राथमिक पदवीधर कदम ब्रिजलाल विनायकराव यांच्या हस्ते गुरुवार दि.२६/०१/२०२३ रोजी पतसंस्थेचा ध्वजारोहण करून त्यांचा पतसंस्थेतर्फे सत्कार करण्यात आला.
सेवानिवृत्त प्रा.प. कदम ब्रिजलाल यांचे मुळगाव मळवटी असून त्यांनी दि.१३/११/१९८७ रोजी जि.प.प्रा.शा. भाडगाव येथून शैक्षणिक सेवेला सुरुवात केली. त्यांनी आपल्या सेवाकाळात विद्यार्थाना पाठ्य-पुस्तकाबरोबर सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय कार्य करण्याचे शिक्षण दिले. तसेच त्यांनी सन १९९२ ते २०२० या काळात शिक्षक संघ, शिक्षक समिती आणि शिक्षक प्रतिनिधी सभा (कॉंग्रेस) या तीन संघटनेत तालुका उपाध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, मराठवाडा अध्यक्ष, राज्य उपाध्यक्ष इत्यादी पदे स्विकारून शिक्षक संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांचे विविध प्रश्न सोडविण्याचे कार्य केले. कदम ब्रिजलाल यांनी स्वलिखित विलासपर्व व स्मृतिगंध हे पुस्तके प्रकाशित केले आहेत. यांच्या या कार्यामुळे त्यांना तालुका आदर्श शिक्षक, राज्यस्तरीय भावाशिंपी, राजश्री शाहू जिल्हास्तरीय इत्यादी पुरस्कार मिळालेत. सध्या ते लातूर तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेचे संचालक ही आहेत. त्यांनी आपली ३५ वर्षाची सेवा पूर्ण करून दि.३१/१२/२०२२ रोजी जि.प.प्रा.शा. चांडेश्वर येथून सेवानिवृत्त झाले आहेत.


दि.२६/०१/२०२३ रोजी कदम ब्रिजलाल यांच्या हस्ते संस्थेचा ध्वजारोहण करून त्यांचा पतसंस्थेतर्फे संचालक गोवर्धन चपडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक हरिदास भावले, संस्थेचे कर्मचारी मल्हारी कांबळे, शिरीष पवार, विनय आयतनबोने यांच्यासह सेवानिवृत्त शिक्षक बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!