लोहारा तालुक्यात अवकाळी पावसामुळे अतोनात नुकसान

 

 

लोहारा ( धाराशिव ) प्रतिनिधी : लोहारा शहर व तालुक्यातील मोघा बु उडरगाव, शिवकरवाडी, कास्ती,नागुर ,शिवारात दि १२ एप्रिल रोजी दुपारी चार च्या सुमारास अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला असून वादळी वारा आणि गारांचा पाऊस झाल्याने ऊस ,उन्हाळी,कांदा पिकासह अब्याचे व ईतर फळ बागांचे मोठे नुकसान झाले आहे, लोहारा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली असून यंदा प्रथमच शुक्रवारी अवकाळी पाऊस झाला असून यात मोघा बुद्रुक येथील शेतकरी शिवराज अंकुश कुंभार यांच्या शेतातील अब्याच्या व झाड पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून गावातील तात्याराव सर्यभान सूर्यवंशी यांच्या घरावरील पत्रे उडाले आहेत, तसेच यशवंतराव पाटील यांच्या घरासमोरील अब्याच झाड त्याच्या घरासमोरील चार चाकी वाहनावर पडले असून यात वाहनाचे नुकसान झाले व तसेच यावेळी शेतकरी बाबासाहेब महादेव पाटील यांच्या शेतातील अब्याचे पडून नुकसान झाले आहे व बाबुराव सूर्यवंशी यांच्या घरावरील पत्रे उडून गेले असून या पाऊसात शेतात ठेवलेला कडबा भिजला असून परिसरात वीज पुरवठा खंडित झाला होता, या अवकाळी पावसामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक अडचणीत सापडला असून याची नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांतुन करण्यात येत आहे,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!