दै. सकाळचे पत्रकार यांना पत्रकारिता क्षेत्रातील “आदर्श पत्रकार” पुरस्काराने सन्मानीत

लोहारा : लोहारा तालुक्यातील होळी येथे रविवारी ८ जानेवारी रोजी एक दिवसीय साहित्यमस्राट अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. दै. सकाळचे पत्रकार निळकंठ कांबळे यांना साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनामध्ये
पत्रकारिता क्षेत्रातील आदर्श पत्रकार पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांचे शुभहस्तेप्रदान करण्यात आले.यावेळी खा.ओमराजे निंबाळकर, सावित्रीमाई साठे,स्वागतध्यक्ष अशोकराजे सरवदे,शिवसेना ठाकरे गटाचे बसवराज वरनाळे,उमरगा तालुकाप्रमुख शहापुरे,सुरेश वाले, अँड. शितल चव्हाण,अँड.प्रभाकर लोंढे, अँड.दिपक जवळगे, राम चव्हाण, रंजना हसुरे,प्रा. व्यकंटेश कसबे, सतिश कसबे,प्रमोद पवार,युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, संमेलनाचे मुख्य आयोजक सुखदेव होळीकर आदी उपस्थित होते.