सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयात क्रीडा सप्ताह सुरु

लोहारा : लोहारा शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोल कनिष्ठ महाविद्यालयात प्रजास्त्ताक दिनाच्या निमित्ताने मैदानी व सांघिक स्पर्धेचे आयोजन कनिष्ठ महाविद्यालयाच्या भव्य क्रिडांगणात करण्यात आले आहे. यावेळी स्पर्धेचे उदघाटन प्राचार्या श्रीमती उर्मिला पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. मैदानी स्पर्धेमध्ये 100 मी धावणे, गोळाफेक, थाळीफेक इत्यादी स्पर्धा आहेत तर सांघिक स्पर्धेमध्ये कबड्डी व क्रिकेट इत्यादी स्पर्धेचा समावेश आहे. या स्पर्धेत कनिष्ठ महाविद्यालयातील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील विदयार्थी व विद्यार्थिनी सहभाग घेत आहेत दि 20 जानेवारी ते 27 जानेवारी पर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांना आपले क्रीडा स्पर्धेतील कौशल्य दाखवण्यासाठी संधी मिळणार आहे. उदघाटन करते वेळी ही स्पर्धा तालुका, विभाग व राज्यसतीय स्पर्धेची रंगीत तालीम असल्याचे प्राचार्या श्रीमती उर्मिला पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
यावेळी क्रीडा विभाग प्रमुख प्रा. प्रशांत काळे,प्रा. विठ्ठल कुन्हाळे, प्रा. विष्णुदास कलमे,प्रा राजेंद्र साळुंके, प्रा. राजेशा अष्टेकर, प्रा. ज्ञानदेव शिंदे, प्रा मुकुंद रसाळ, प्रा.नारायण आनंदगावकर, प्रा. सुनिल बहिरे, प्रा उद्धव सोमवंशी, प्रा. विजय उंबरे यांच्यासह कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.