छत्रपती शिवाजी महाराज चौकात संभाजी ब्रिगेडच्या वतीने आंदोलन

लोहारा : लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरू अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने शुक्रवारी २० जानेवारी रोजी दुपारी आंदोलन केले.
उमरगा तालुक्यातील बलसूर येथील एका तरूणाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द लिहिले आहे. याचा सर्वस्तारातून निषेध होत आहे. या घटनेच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडने आज दुपारी सव्वा एकच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन केले. देशात व राज्यात महापुरुषांचा अवमान करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. यांच्या विकृत मानसिकतेमुळे समाजात अशांतता निर्माण होत असून सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे. महापुरुषांचा अवमान करून समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी, जेणेकरून यापुढे महापुरुषांची बदनामी करण्याचे धाडस कोणी करणार नाही, असे निवेदन पोलिस निरीक्षक अजित चिंतले यांना दिले.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शरद पवार, संघटक धनराज बिराजदार,युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, तालुकाध्यक्ष बालाजी यादव,माजी नगरसेवक श्याम नारायणकर,चंद्रशेखर जावळे, प्रदीप खराडे, स्वप्नील गुंड, लक्ष्मण पवार, राहुल सुरवसे, कालिदास गायकवाड, गणेश सुरवसे, सुभाष बिराजदार, वैजनाथ पाटील, सुलतान मुल्ला, रियाज खडीवाले, चनबस जेवळीकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.