खरीप 2020 पिक विमा नुकसान भरपाई उच्च न्यायालयात उद्या गुरुवारी सुनावणी – विमा अभ्यासक अनिल जगताप

खरीप 2020 पिक विमा नुकसान भरपाई उच्च न्यायालयात आज गुरुवार 7 मार्च रोजी दुपारी दोन वाजून 30 मिनिटांनीअंतिम सुनावणी . विमा अभ्यासक अनिल जगताप यांची माहिती

लोहारा ( धाराशिव ) : छत्रपती संभाजी नगर उच्च न्यायालय येथे यापूर्वीच एक फेब्रुवारी रोजी अंतिम सुनावणी होणार होती मात्र दुर्दैवाने त्याच दिवशी गॅस टँकर पलटी झाल्याने पाच किलोमीटरचा परिसर रिकामा केला होता त्यामुळे या दिवशी सुनावणी होऊ शकली नाही म्हणून न्यायालयाने खास आदेश काढून सात मार्च रोजी अंतिम सुनावणी ठेवली आहे.

खरीप 2020 मध्ये 948,990 अर्जदार शेतकऱ्यांनी पिक विमा भरला होता मात्र शेतकऱ्याने 72 तासात पूर्व सूचना दिली नाही या कारणाने बजाज अलायन्स पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांना विमा नाकारला. धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी व लोकप्रतिनिधीने याबाबत उच्च न्यायालय ,सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर दोन्ही न्यायालयाने शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 18 हजार रुपये प्रमाणे एकूण 544 कोटी रुपये रक्कम देण्याचे आदेश विमा कंपनीला दिले. मात्र बजाज अलायन्स पिक विमा कंपनीने सर्वोच्च न्यायालयात जमा असलेले 200 कोटी रुपये रकमेव्यतिरिक्त रक्कम देण्यास नकार दिला म्हणून धाराशिव जिल्ह्यातून तीन अवमान याचिका दाखल झाल्या जिल्हाधिकाऱ्यांनी महसुली कारवाई सुरू केली त्याला स्थगिती देताना उच्च न्यायालयाने दीडशे कोटी उच्च न्यायालयात तर बारा कोटी जिल्हाधिकारी यांच्याकडे भरण्याच्या अटीवर स्थगिती दिली.

HTML img Tag Simply Easy Learning

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उच्च न्यायालयातील 75 कोटी व जिल्हाधिकारी यांच्याकडील 12 व इतर रक्कम मिळून 119 कोटीचे वाटप झाले आत्तापर्यंत 376 कोटी रुपयांचे वाटप झाले आहे.

अद्यापही पीक विमा कंपनीकडून 168 कोटी रुपये येणे बाकी असून पैकी 75 कोटी रुपये उच्च न्यायालयात जमा असून 93 कोटी रुपये रक्कम विमा कंपनीकडून येणे बाकी आहे.

दरम्यान पिक विमा कंपनीच्या म्हणण्यानुसार आम्ही फक्त एस डी आर एफ व एनडीआरएफ प्रमाणेच मदतीचे वाटप करू अर्थात दोन हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाई देऊ अशी भूमिका घेतली आहे.

त्याबाबत उच्च न्यायालयात उद्या महत्त्वपूर्ण सुनावणी असून जराशी जिल्ह्यातील शेतकऱ्याचे उद्याच्या सुनावणी कडे लक्ष लागले आहे.

खरीप 2020 मध्ये पूर्ण रक्कम व त्यावरील व्याज मिळाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही बळीराजाच्या आर्थिक विकासासाठी आपण नेहमी कटिबद्ध आहोत.
अनिल जगताप, पिक विमा याचिकाकर्ते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!