लोहारा शहरात श्री.उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सायंकाळी मशाल रॅलीचे आयोजन

लोहारा ( जि.धाराशिव ) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख, श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची गुरुवारी 7 मार्च रोजी दुपारी 5 वाजता कै.शिवाजी दाजी मोरे क्रिडा संकुल छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय उमरगा येथे जाहीर सभा होणार तरी या सभेसाठी नागरीकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.असे अवाहन करण्यात आले आहे.

तसेच गुरुवारीच सायंकाळी 6:30 वाजता लोहारा शहरामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यत मशाल रॅली काढण्यात येणार आहे. तरी लोहारा शहरातील नागरीकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे अवाहन शिवसेना लोहारा तालुकाप्रमुख अमोल बिराजदार व लोहारा शहरप्रमुख सलिम शेख यांनी केले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!