अखिल भारतीय छावा संघटनेचा आ.पाटील यांच्या उपोषणाला जाहीर पाठींबा

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असलेल्या आमदार कैलास पाटील यांच्या बेमुदत उपोषणास अखिल भारतीय छावा संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष कालिदास (महाराज) गायकवाड व जिल्हाध्यक्ष शशिकांत बप्पा पाटील,शहर उपाध्यक्ष ज्योतिराम काळे, लोहारा तालुकाध्यक्ष चंद्रशेखर आप्पा जावळे, उमरगा तालुकाध्यक्ष बाळासाहेब माने, रोहित पाटील यांच्या आदींनी उपस्थित राहुन जाहीर पाठींबा दिला आहे.