तावशीगड शिवारातून पाच शेळ्या व पंधरा कोंबड्या चोरीला

लोहारा (उस्मानाबाद ) : लोहारा तालुक्यातील तावशीगड शिवारातून पाच शेळ्या व पंधरा कोंबड्या चोरीला गेल्याची तक्रार लोहारा पोलीस ठाण्यात गुरुवारी २७ ऑक्टोबर रोजी करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती आशी की, तावशीगड येथिल शेतकरी अशोक मारुती जाधव यांची गावालगतच शेती आहे. ते शनिवारी दिवसभर आपल्या शेतात जनावरे व शेळ्या राखत होते. सांयकांळी शेतातील पञ्याच्या शेडमध्ये शेळ्या व बाहेर जनावरे बांधून ते घराकडे आले. दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी ते शेतात जनावरांचे दुध काढण्यासठी गेले असता शेतातील पञ्याच्या शेडचे कुलूप खाली पडले होते. याबरोबर शेड राञी कोडवलेल्या पाच शेळ्या व पंधरा कोडब्या गायब होत्या. त्यांनी या शेळ्या व कोबड्यांचा तीन चार दिवस शिवारात शोधाशोध केले. माञ कांहीच पत्ता लागला नाही. या संदर्भात लोहारा पोलीस ठाण्यात शेळ्या चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली आहे.