
धाराशिव : खरीप 2021 च्या संदर्भात उदय उच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी 374 कोटी रुपये डिपॉझिट करण्यासाठी शासनाकडून प्रतिज्ञापत्र सादर याचिका करते अनिल जगताप यांची माहिती.
खरीप 2021 मध्ये धाराशिव जिल्ह्यातील सहा लाख 67 हजार 483 शेतकऱ्यांनी विमा भरला होता अतिवृष्टी सततचा पाऊस होऊनही पिक विमा कंपनीने केंद्रीय परिपत्रकाचा चुकीचा अर्थ लोक धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ 50 टक्के इतकीच रक्कम दिली होती अर्थात ती 374 कोटी रुपये इतकी होती.
त्याविरुद्ध सुरुवातीला जिल्हास्तरीय समितीने व नंतर विभागीय आयुक्ताने शेतकऱ्यांना उर्वरित 374 कोटी रुपये देण्याचे आदेश दिले होते मात्र कंपनी देत नव्हती म्हणून जिल्हाधिकारी धाराशिव यांनी महसुली कारवाई सुरू केली होती मात्र त्याला पिक विमा कंपनीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते व उच्च न्यायालयाने त्यांना कुठलीही रक्कम भरून न घेता स्थगिती दिली होती.

या सर्व प्रक्रियेला एक वर्ष होऊनही काहीच हालचाल होत नव्हती म्हणून मी स्वतः राज्य शासनाकडे प्रतिज्ञापत्र सादर करून कंपनीकडून 374 कोटी रुपये भरून शेतकऱ्यांना वाटप करावी असा आग्रह धरला होता त्यानुसार शासनाने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केली असून उद्याच्या सुनावणी कडे सर्वांचे लक्ष आहे.
या विरुद्ध मी राज्य तक्रार निवारण समितीकडे याचिका दाखल केली होती बैठकी ही झाली मात्र उच्च न्यायालयात या संदर्भात प्रकरण दाखल असल्याने अद्याप निकाल दिला नाही मी उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली असून उद्या त्यावर महत्त्वपूर्ण सुनावणी आहे. आशा आहे उच्च न्यायालय पिक विमा कंपनीकडून 374 कोटी रुपये भरून शेतकऱ्यांना वाटप करण्याची परवानगी द्यावी.
अनिल जगताप, पिक विमा याचिकाकर्ते खरीप 2021
Back to top button
error: Content is protected !!