आमदार पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी उद्या लोहारा शहरात ठिय्या आंदोलन

लोहारा : उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असलेल्या आमदार कैलास पाटील यांच्या बेमुदत उपोषणास पाठींबा दर्शविण्यासाठी उद्या शुक्रवारी सकाळी ११ वाजता लोहारा शहरातील श्री.छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना ठाकरे गट, युवासेना, महीला आघाडी लोहारा तालुका यांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.