श्री. शहाजी महावीर जाधव मौजे. गुंजोटी ता.उमरगा जिल्हा.धाराशिव (उस्मानाबाद) एका सामान्य शेतकरी कुटुंबामध्ये १० एप्रिल १९८० रोजी अनुसया व महावीर जाधव या आई वडिलांच्या पोटी जन्म झाला. एकत्र कुटुंब पद्धतीत आजी आजोबा,चार चुलते, आत्या यांच्या संगोपनात या तीन भावांचा सांभाळ झाला. शहाजी,बालाजी आणि माधुरी हे बहिण भावंड . जाधव कुटुंबाचा मूळ व्यवसाय शेती शिक्षणाच्या अभावामुळे आणि इच्छा असताना हि आर्थिक परिस्तिथीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहिलेले कुटुंब, मराठवाड्यातील सततचा दुष्काळ, नापिकीमुळे शेतीचे उत्पादन अत्यंत कमी आणि एवढ्या मोठ्या कुटुंबाचा आर्थिक भार शेतीवर अवलंबून असल्यामुळे घरची परिस्तिथी अत्यंत बेताची त्यामुळे प्रत्येक मुलांचे लाड व गरजा पुरवणे पालकांना शक्य न्हवते तरीही वडील महावीर जाधव व आई अनुसया जाधव यांच्या तीव्र इच्छे मुळे तीनही मुलांना शिक्षण शिकवण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला.
यातूनच बालाजीचे १२ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून तो पोलीस,भारतीय सैनिकाची पूर्वतयारी करण्यासाठी तो घरातून बाहेर पडला पण भरतीचा अनिश्चित कालावधी असल्यामुळे आणि आर्थिक परिस्तिथी बेताची असल्यामुळे नाविलाजास्तव पूर्व तयारी सोडून वडिलांना हातभार लावण्यासाठी शेतीकडे वळावे लागले तरीही आई वडिलांनी मुलाच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष न करता बहिण माधुरी यांचे उच्च शिक्षण संभाजीनगर (औरंगाबाद ) शहरातील (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात रसायनशास्त्र विषयात उच्च पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले.

तर शहाजी यांचे १२ वी पर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर दोन मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवणे शक्य नसल्यामुळे बहिण्याच्या शिक्षणाला आर्थिक हातभार लागावा म्हणून शहाजीने आपले शिक्षण अर्धवट सोडून पुणे शहर येथे खाजगी कंपनी मध्ये काम करू लागला. शहजीची हुशारी शिक्षणातील आवड असूनही आर्थिक परिस्तिथीमुळे शिक्षण अर्धवट सोडल्याची खंत आई वडीला इतकीच मामा व मावशीला वाटू लागली.

मामानी शहाजीचे मन परिवर्तन करून शिक्षणाचे महत्व सांगितले व परत गावी घेऊन आले. मामा दत्तात्रय गायकवाड (गुंजोटी) आणि मावशी सौ.सुरेखा भोसले (गुंजोटी) हे दोघेही स्वातंत्र्य पूर्व काळातील नामांकित शैक्षणिक संस्था श्रीकृष्ण महाविद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनीच शहाजीच्या पुढील शिक्षणाचा खर्च स्वत: करून बी.एस.सी. पर्यंतचे शिक्षण श्रीकृष्ण महाविद्यालयात तर पदवीत्तर शिक्षण (एम.एस.सी गणित ) आदर्श महाविद्यालय उमरगा येथे शहाजीने पूर्ण केले. शिक्षकी पेशात आवड असल्यामुळे आणि मामा व मावशी शिक्षक असल्यामुळे आपण सुद्धा शिक्षक व्हावे म्हणून शहाजीने शिक्षकासाठी पत्र असलेल्या शिक्षणशास्त्र (बी.एड) या पदवीसाठी धाराशिव येथील तेरणा शिक्षण संस्थेत सन २००३-०४ मध्ये पूर्ण केले.

शिक्षक म्हणू नौकरी लागण्यासाठी या कालावधी मध्ये डोनेशन देणे अत्यंत म्हत्वाचे असल्यामुळे गुणवत्ता असूनही शिक्षण संस्थेत पैसे भरून शिक्षक होण्याची आर्थिक परिस्तिथी नसल्यामुळे उच्च शिक्षण घेऊनही गावातच कोचिंग क्लासेस सुरु करण्याचा पर्याय शहाजीने निवडला पण ग्रामीण भागात शेतीवर आधारित आर्थिक व्यवस्था असल्यामुळे आणि ग्रामीण भागात शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन नसल्यामुळे म्हणावे तसे कोचिंग क्लासेस चालत न्हवते त्यामुळे पारंपारिक शेतीला जोड म्हणून गावात सुरु केलेले कोचिंग क्लासेस बंध करून सन २००५ मध्ये बीड जिल्ह्यातील पाटोदा या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या लिटल फ्लावर इंग्लिश स्कूल मध्ये मासिक १२०० रु. मानधनावर मुलाखत देऊन शिक्षक म्हणून रुजू झाले.

मुळातच शिक्षणाची आवड असल्यामुळे तन पण धनाने त्याच संस्थेत राहून शाळेचा विकास प्रामाणिकपणे करू लागले त्यामुळे शिक्षणातील आवड विद्यार्थी प्रिय शिक्षक आणि प्रामाणिकपणा पाहून ते अल्पावधीतच संस्थाचालकाच्या विश्वासास पत्र ठरले संस्थाचालकांनी त्यांच्यावर पूर्ण संस्थेची जबाबदारी सोपवून निचिन्त झाले. सन २००७ मध्ये बहिण माधुरी आणि भाऊ बालाजी यांचे लग्न झाले. त्यामुळे कुटुंबावर आर्थिक भार पडला पारंपारिक शेतीत फारशे उत्पादन निगत नसल्यामुळे एकत्रित कुटुंबाचा आर्थिक भार यात गावापासून दूर जाऊन नौकरी करणे गरजेचे असल्याचे आणि कुटुंबाला आर्थिक मदत करणे गरजेचे असल्याचे शहाजीला वाटू लागले कारण संपूर्ण जाधव कुटुंबात उच्च शिक्षण घेतलेले

शहाजी आणि त्यांची बहिण हे दोघेच होते त्यामुळे शिक्षणाचे महत्व कुटुंबातील इतर बहिण भावना सांगण्यासाठी व त्यांना ते समजण्यासाठी शिक्षण क्षेत्रात नौकरी करणे शहाजीला गरजेचे वाटू लागले त्याच्यातूनच प्रामाणिकपणे ते नौकरी करू लागले याच काळात डीसेंबर २००९ मध्ये निलंगा येथील स्व. विनायकराव गायकवाड यांची उच्च शिक्षित मुलगी सविता यांच्याशी विवाह झाला.लग्नानंतर सविता यांनीही लिटील फ्लावर इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. आल्पशे मानधन वाढती महागाई याही काळात दोघांनीही परिस्तिथी समजून आहे त्या परीस्तिथीत सुखाने संसार करू लागले.दोघानाही सामाजिक आवड शिक्षणातील आव आड असल्यामुळे सन २००९ मध्ये उस्मानाबाद जिल्हा एजुकेशन सोसायटी या सामाजिक व शैक्षणिक संस्थेची स्थापना केली व सन २०१३ साली या संस्थेच्या माध्यमातून न्यू.व्हिजन इंग्लिश स्कूल नावाने लोहारा ता.लोहारा जिल्हा धाराशिव येथे पूर्व प्राथमिक इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु केली.सुरुवातीला २० विद्यार्थ्यांपासून गेल्या १० वर्षात २० विद्यार्थ्यांपासून गेल्या १० वर्षात ३६० विद्यार्थ्यांपर्यंत आणि पूर्व प्राथमिक ते ८ वी पर्यंत हि शाळा पोहचवण्याचे सर्व श्रेय या पती पत्नीला जाते. या दहा वार्ह्स्याच्या कालावधी मध्ये लोहारा सारख्या शहरात शिक्षण संस्था सुरु करताना अनेक अडचणी आल्या या प्रत्येक अडचणीत शहाजी यांना त्यांची पत्नी सविता यांनी खंबीरपणे साथ दिली व या दोघांनी लोहारा परिसरात आपल्या स्वभावातून अनेक मित्र परिवार निर्माण केला तसेच सामाजिक उपक्रमातून आपली सामाजिक बांधिलकी वेळोवेळी समाजाला दाखवून दिली त्यातूनच आज या संस्था वाढीस त्यांच्या ह्या सर्व प्रयत्नामुळे यश आले आहे. हि शिक्षण संस्था काढण्याची प्रेरणा शहाजी जाधव यांना त्यांचे गुरु उच्च शिक्षण संचालक व त्यावेळेसचे बलभीम महाविद्यालय बीड येथील प्राचार्य डॉ. धनराज माने यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून स्वतःची शिक्षण संस्था चालू करण्याची प्रेरणा शहाजी यांना दिली व त्यांनी ते सार्थ करून दाखवले.

याच काळात मे २०१३ मध्ये शहजींच्या संसारिक जीवनाच्या वेलीवर कन्येच्या रूपाने सुंदर असे फुल उमलले त्यामुळे संसारिक जीवन आनंदाने उजळून निगाले त्यांची कन्या संस्कृती हिला लहान पानापासूनच शिक्षणाचे बाळकडू मिळू लागले. त्यामुळे ती अभ्यासात हुशार होती त्यामुळे येणारे पालक तिला प्रश्न विचारत तिची हुशारी पाहून आम्च्याशाळेतील प्रवेश वाढू लागले. सुरुवातीला २० विध्यार्थ्यावर सुरु झालेली शाळा त्याला लागणारे साहित्य शिक्षक कर्मचारी स्कूल बस या सर्वांचे मानधन देण्यासाठी आर्थिक परिस्तिथी शहाजी जाधव यांची न्हवती तेंव्हा याच काळात कोणतेही मानधन न घेता शाळेत आम्ही काम करू असा मानसिक आधार त्यांच्या नातेवईकानी आणि मित्रांनी दिला.

त्यामध्ये डी.एड. झालेली मामाची मुलगी मयुरी मावस भाऊ गोविंद म्हेवना संदीप आणि शहाजीचा वर्गमित्र विठ्ठल पांचाल व त्यांची पत्नी यांनी शाळेत राहूनच एक वर्ष कुठल्याही मानधनाची अपेक्षा न करता अत्यंत तळमळीने विद्यार्थ्यांना शिकवले व विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस सहकार्य केले. यांच्या सहकार्यामुळेच सुरुवातीच्या काळात शहाजी जाधव यांना शैक्षणिक वाढीस बळ मिळाले. शहाजी आणि सविता या पती पत्नीने या शिक्षण संस्थेचा भार आपल्या खांद्यावर समर्थपने पेलत गेल्या १० वर्षात कटू व गोड अनुभवातून शैक्षणिक गुणवत्ता आणि विध्यार्थी वाढवण्याचे कार्य करत आहेत.आपल्या संस्थेचा ठसा पालकांच्या मनामध्ये बिंबवून प्रामाणिकपणे आहोरात्र मेहनत करून ग्रामीण भागातील पालकांच्या पाल्याचा सर्वांगीण विकास साधत शाळेचा विकास साधत चढता आलेख ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. याच काळात १९ मे २०१६ ला त्यांना पुत्र रत्न प्राप्त होवून दुग्शर्करा योग त्यांच्या जीवनात जुळून आला. शहाजी व सविता यांच्या सुखाच्या आणि आनंदाच्या संसाराबरोबरच शाळेचा विकासहि अत्यंत झपाट्याने होत आहे.

गुणवत्तापूर्ण शिक्षण व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास साधन्याबरोबरच आज सन २०२२-२३ मध्ये न्यू. व्हिजन इंग्लिश स्कूल संस्था दशक पूर्तीच्या उंबरठ्यावर उभी आहे. लोहारा शहर व परिसरातील ३६० विध्यार्थी आज शाळेत दर्जेदार व गुणवत्तापूर्ण सर्व सोयीसुविधायुक्त शिक्षण घेत आहेत.याच बरोबर २० ते २५ शिक्षक कर्मचारी कार्यरत आहेत. हा दशक पुरती सोहळा साजरा करत असताना इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतच्या मान्यतेसाठी प्रस्ताव संबंधित शिक्षण विभागात सदर केला असून त्यास लवकरच शासन मान्यता मिळणार आहे. याच कालावधीत संस्थेने शाळेसाठी एक एकर जागा विकत घेऊन निसर्ग रम्य अश्या परिसरात सर्व भौतिक सुविधा पुरवून ग्रामीण भागातील गरीब शेतकरी मजूर यांच्या पाल्यांना इंग्रजी शिक्षण आल्प दारामध्ये देण्याचा प्रयत्न शहाजी जाधव करीत आहेत.शाळेसोबत सामाजिक उपक्रमामध्ये शहाजी जाधव यांचा सहभाग असतो त्यामुळेच त्यांना त्यांच्या कार्याची दाखल घेऊन समाजातील विविध संस्थांनी त्यांचा सन्मान व पुरस्कार देऊन गौरव केला आहे .त्यांच्या या शैक्षणिक व सामाजिक कार्यात त्यांची पत्नी सविता मुलगी संस्कृती मुलगा शिवाजी आणि आई वडिलांचे सहकार्य कायम पाठीशी आहे त्यामुळे ते आनंदाने सामाजिक व शैक्षणिक कार्यात हिरीरीने भाग घेतात.

उम्र थका नाही सकती, ठोकरे गिरा नही सकते,
अगर जिद्द हो जीतनेकी, परीस्थितीयां हरा नही सकती!
Back to top button
error: Content is protected !!