HTML img Tag
लोहारा ( जि.धाराशिव ) : आज दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी ” राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त ” लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्याना ( TTD ) जंतनाशक गोळ्या वाटून या कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले.या प्रसंगी लोहारा ग्रामीण रुग्णालयात नव्यानेच रूजू झालेले वैद्यकीय अधिकारी डॉ श्री सुनिल मंडले, आरोग्य कर्मचारी श्री अंगद गिराम, श्री सुधीर रोडगे , श्रीमती. अंजू साळुंके, मुख्याध्यापक श्री शहाजी जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस श्री गिराम यांनी कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती आपल्या प्रास्ताविकामध्ये देवून हि गोळी प्रत्येकानी जेवण केल्यानंतर चावून खावी असे सांगितले. डॉ मंडले यांच्या हस्ते प्राथमिक स्वरूपात कु.गौरी विठ्ठल धवन हिला जंतनाशक गोळी खाऊ घालण्यात आली. यावेळी आपल्या मार्गदर्शनात डॉ मंडले म्हणाले की, राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त या गोळ्या प्रत्येक विध्यार्थ्यांना देवुन हा आजार आपल्या देशातून कायमचा नष्ट करण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे, म्हणूनच या अभियानाचे ब्रीदवाक्य आहे “जंतुपसून मुक्त – भारत होईल सशक्त. ” या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.श्री यशवंत चंदनशिवे, यांनी तर आभार श्री व्यंकटेश पोतदार यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाप्रसंगी स्कुलचे सिद्धेश्वर सुरवसे, प्रेमदास राठोड, सविता जाधव, सोनाली काटे, पूजा चौरे, माधवी होगाडे, अनिता मनशेट्टी शिक्षक कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी उपास्थित होते.
HTML img Tag
Back to top button
error: Content is protected !!