सास्तूर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयात राष्ट्रीय जंतनाशक दिवस साजरा

लोहारा ( जि.धाराशिव ) : संपूर्ण जगभरात १३ फेब्रुवारी हा दिवस ‘राष्ट्रीय जंतनाशक दिवस’ म्हणून साजरा केला जातो. १ ते १९ वर्ष वयोगटातील सर्व मुलां-मुलीना शाळा व अंगणवाडी स्तरावर जंतनाशक गोळ्या निशुल्क दिल्या जातील. नोदणी न झालेल्या आणि शाळा बाह्य मुला-मुलींना अंगणवाडी स्तरावर जंतनाशक गोळ्या दिल्या जातील. राष्ट्रीय जंतनाशक दिवस ग्रामीण रुग्णालय स्पर्श सास्तूर येथे रॅली काढून व पथनाट्य करून जंतनाशक विषयी जनजागृती करण्यात आली.

HTML img Tag Simply Easy Learning

राष्ट्रीय जंतनाशक दिवसाचे औचित्य साधून आज दि.१३ फेब्रुवारी २०२४ रोजी जिल्हा रुग्णालय धाराशिव व स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तूर व एम.आय.एम.एस.आर. मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने सास्तूर गावात जनजागरण रँली काढण्यात आली. या रँलीचे उदघाटक स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी श्री जोशी आर.बी., स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे वैदकीय अधिकारी डॉ भक्तराज ठोंबरे, एम.आय.एम.एस. आर. मेडिकल कॉलेजचे श्री डॉ. ज्ञानेश्वर डिगोळे, श्रीम.डॉ. मृणाली पुजारी, डॉ अरमान शेख, श्री. गणेश कराड-मेडिकल सोशल वर्कर यांनी हिरवी झेंडी दाखवून रँलीला सुरुवात झाली.


जंत संसर्ग कसा होतो याविषयी रँलीमधून घोषणा देऊन सांगण्यात आले. जंत संसर्ग झाल्यास मुलात होणारे बदल कुपोषण आणि रक्तक्षय होऊन त्यांना सतत थकवा जाणवतो. त्याची शारीरीक वाढ व विकास पूर्णत होत नाही. जंत नाशक गोळी बरोबर जंतापासून बचावासाठी घ्यावयची काळजी घरा सभोवतालचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा, पायात नेहमी बूट- चप्पल घालावा, उघड्यावर शौचास बसू नये, नेहमी शौचालयाचा वापर करावा, आपले हात साबणाने विशेषत: जेवणाआधी आणि शौचाहून आल्यानंतर, नेहमी स्वच्छ पाण्याने फळे व भाज्या धुवाव्यात, खाण्याचे पदार्थात नेहमी झाकून ठेवावेत, नेहमी स्वच्छ पाणी प्यावे, नखे स्वच्छ ठेवा व नियमित कापा ई. पासून जंत संसर्ग रोखण्यासाठी मदत होते.
दि. १३ फेब्रुवारी २०२४ रोजी सर्व १ ते १९ वर्षे वयोगटातील मुलां-मुलीनी शाळा व अंगणवाडी स्तरावर जंतनाशक गोळ्या घ्याव्यात असे आवाहन ग्रामीण रुग्णालय स्पर्शचे प्रकल्प अधिकारी श्री. जोशी आर.बी. यांनी केले. तसेच ते पुढे बोलताना म्हणाले कि, ज्या मुलां-मुलीना दि १३ फेब्रुवारी रोजी जंतनाशक गोळ्या दिल्या नसतील त्यांनी दि २० फेब्रुवारी रोजीच्या मॉम-अप दिनी गोळ्या घ्याव्यात.


रँलीमध्ये स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे श्री.आर.बी. जोशी, स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे सर्व कर्मचारी व रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते तसेच एम.आय.एम.एस.आर. मेडिकल कॉलेजचे सर्व विध्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्पर्श ग्रामीण रुग्णालय सर्व कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!