नागुर येथे गाव चलो अभियान कार्यक्रम संपन्न, ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद


लोहारा (जि.धाराशिव ) : लोहारा तालुक्यातील नागुर येथील श्रीराम मंदिरात दि.10 फेब्रुवारी 2024 रोजी लोहारा तालुका भाजपाच्या वतीने गाव चलो अभियान राबविण्यात आले. यावेळी प्रमुख म्हणून प्रवाशी कार्यकर्त्या तथा भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्षा सौ. संजीवनी बुरले, ग्राम संयोजक तथा उपसरपंच दिनकरराव जावळे पाटील, भाजपा तालुका सरचिटणीस इक्बाल मुल्ला, तालुका उपाध्यक्ष संपत देवकर, ग्रामपंचायत सदस्य जफर मुल्लानी, रमेश जाधव, महिला तालुका उपाध्यक्षा अश्विनी पाटील, सद्दाम मुल्लानी, आदि उपस्थित होते. यावेळी उपसरपंच दिनकरराव जावळे पाटील, प्रवाशी कार्यकर्त्या संजीवनी बुरले, तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, यांनी पंतप्रधान मोदी व राज्य सरकारनी सर्वसामान्य जनतेसाठी राबविलेल्या विविध योजनांची सविस्तर माहिती सांगितली. यावेळी मोदी सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. यानंतर उज्वला गॅस लाभार्थी, पीएम किसान योजना लाभार्थ्यी, अंगणवाडी कार्यकर्ती, अशा विविध लाभार्थ्यांच्या भेटी घेऊन संवाद साधुन त्यांच्या समस्या जाणुन घेऊन निरसन करण्यात आले. यावेळी अरुण सलगरे, शेषेराव जाधव, मैनुद्दीन मुल्लानी, महादेव लोभे, महेमुद मुल्लानी, राजकुमार सुर्यवंशी, जनार्दन जावळे, धनु जाधव, सुभाष पाटील, ज्ञानोबा सलगरे, उषा पाटील, मुसका मुल्लानी, दादा पाटील, संदीप जाधव, तानाजी जावळे, केशरबाई कदम, उषाबाई देवकर, छायाबाई सुळ, रेणुका मिसाळ, यांच्यास. महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.Lorem ipsum dolor sit amet, consectetur.