“जबरी चोरीतील 2 आरोपी गुन्हेशाखेच्या ताब्यात”

धाराशिव : स्थानिक गुन्हे शाखा : फिर्यादी नामे- संतोष शिवाजी भोसले, वय 46 वर्षे, रा. सरकोली, ता. पंढरपुर, जि. सोलापूर हे दि. 04.02.2024 रोजी 05.00 वा. सु. पंढरपुर ते काळेबोरगाव येथे अंत्यविधी करीता जात होते. दरम्यान कवालदरा येथे आले असता संतोष भोसले यांचे गाडीसमोर अचानकपणे दगड टाकल्याचा मोठा आवाज आल्याने ड्रायव्हर याने गाडी साईडला थांबवून खाली उतरुन गाडीचे काय नुकसान झाले आहे काय हे बघण्याकरीता तो खाली वाकून पाहत असताना अनोळखी एका इसमाने ड्रायव्हर भगीरथ भारत विभुते यांना काठीने मारहाण करुन जखमी करुन इतर तीन अनोळखी इसमांनी संतोष भोसले व त्यांची पत्नी यांना गाडीतुन खाली उतरवून मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी देवून त्यांचे जवळील 37 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, टायटन घड्याळ, रोख रक्कम 12,500₹ असा एकुण 2,09,550 ₹ किंमतीचा माल जबरीने लुटून पसार झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- संतोष भोसले यांनी दि.06.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे गुरनं 32/2024 कलम 392, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
गुन्हा तपासादरम्यान मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन. यांचे मार्गदर्शनाखाली सथानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. वासुदेव मोरे यांचे आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्याच्या कार्यपध्दीच्या व मिळालेल्या तांत्रिक विश्लेशन व गोपनीय माहितीच्या आधारे कन्हेरवाडी पाटी, ता. कळंब येथील- श्यामसुंदर बिभिषन काळे, वय 32 वर्षे, सुनिल उर्फ भैया बबन शिंदे, वय 24 वर्षे, रा. मोहा, ता. कळंब जि. धाराशिव यांना गुन्हा घडल्यापासून अवघ्या काही दिवसात दि. 09.02.2024 रोजी 09.00 वा. सु. कन्हेरवाडी व मोहा येथुन ताब्यात घेतले. त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपुस केली असता त्यांनी प्रथमत: पोलीसंना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना अधिक विश्वासात घेउन विचारपुस केली असता त्यांनी सदर गुन्हा त्यांच्या अन्य दोन साथीदारांच्या मदतीने केल्याची कबुली दिली. पोलीसांनी त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यातील गेल्या माला पैकी 2,000₹ रोख रक्कम हस्तगत केली. आरोपी यास चोरीच्या मालासह धाराशिव ग्रामीण पोलीसांच्या ताब्यात दिले असून त्यांच्या अन्य दोन साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व मा. श्री. गौहर हसन. यांचे मार्गदर्शनाखाली सथानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. वासुदेव मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सुदर्शन कासार, पोउपनि- श्री. संदीप ओहोळ, पोलीस हावलदार- विनोद जानराव, जावेद काझी, अमोल निंबाळकर, समाधान वाघमारे, शौकत पठाण, फरहाण पठाण, नितीन जाधवर, महेबुब अरब, रत्नदिप डोंगरे, मपोहा/ शोभा बांगर, रंजना होळकर यांच्या पथकाने केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!